जे स्कूल व ज्युनिअर कॉलेज शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य आर. पी. पाटील सर तर उपाध्यक्षपदी प्रमोद सौंदळे
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल आणि ज्यू कॉलेज मुक्ताईनगर येथे शिक्षक पालक संघा ची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. नवीन शैक्षणिक वर्षासाठी अध्यक्ष प्राचार्य.श्री आर पी पाटील सर, तर उपाध्यक्ष प्रमोद सौंदळ तर सचिव पदी एस आर ठाकूर सर यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी शाळा हे कुटुंबा नंतर महत्वाची भूमिका बजावत असते.त्या दृष्टीने शाळेमध्ये राबवले जाणारे सहशालेय उपक्रम तसेच अभ्यासक्रम,शारीरिक कसरती साठी क्रीडा स्पर्धा,गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,वेगवेगळ्या परीक्षा,क्रीडा स्पर्धा मध्ये मुलांनी मिळवलेले यश ,विद्यालयात राबवले जाणारे उपक्रम साठी पालक संघ दुवा साधण्याचे काम करत असतो.शिक्षण विभाग व शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने हा पालक संघ काम करत असतो. शिक्षक – पालक यांच्यात समन्वय साधण्याची भूमिका शिक्षक पालक संघ पार पाडत असतो.अशी पालक संघाची पार्श्वभूमी उप्र प्राचार्य श्री जे जे पाटील सरानी मांडली.
यावेळी शिक्षक पालक सभेसाठी बहुसंख्य पालकांनी उपस्थिती दिली.विद्यार्थी हिताच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. यामध्ये काही पालकांनी मुला मुलींना येणाऱ्या अडचणी सुद्धा मांडल्या त्या अडचणी लवकरच दूर करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील अशी ग्वाही संस्थेच्या वतीने एस आर ठाकूर सर यांनी दिली, मागील वर्षीचा लेखा जोखा मांडण्यात आला.नवीन शैक्षणिक वर्षासाठी अध्यक्ष प्राचार्य.श्री आर पी पाटील सर, तर उपाध्यक्ष प्रमोद सौंदळ तर सचिव पदी एस आर ठाकूर सर आणि सदस्य म्हणून प्रत्येक वर्गा प्रमाणे एक पालक आणि शिक्षक या प्रमाणे कार्यकारणी गठित करण्यात आली.प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ सी एस चौधरी यांनी पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन केले.पर्यवेक्षक एस पी राठोड, व्हीं डी बऱ्हाटे आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.सूत्र संचालन श्री एस आर ठाकूर यांनी केले तर आभार श्री सी डी पाटील यांनी मानले.