मुख्याध्यापिकेची विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ, संतप्त पालकांनी शाळेला ठोकले कुलूप
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा भाषेत अश्लील शिवीगाळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यातील हिंगोणा शाळेत समोर आला आहे. विद्यार्थीनींनी पालकांना हा प्रकार सांगितल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला चक्क कुलूप ठोकले. या घटनेने शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, विद्यार्थीनींनी आरोप केला आहे की, यावल तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा भाषेत शिवीगाळ करतात, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून, तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही.
या बाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानेही मुख्याध्यापिकांना समज दिली, तरीही मुख्याध्यापिका अश्लील शिवीगाळ करीतच होती. मुख्याध्यापिकेच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. अखेर संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकून मुख्याध्यापिकेच्या बदलीची मागणी केली आहे.
मुख्याध्यापिका नेहमीच आजही लज्जा वाटेल अशा शिव्या देत असतात, जोपर्यंत त्यांची बदली होत नाही, तोपर्यंत शाळेत जाणार नाहीत, असे पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी
सांगितले.

रावेर यावल चे आमदार अमोल जावळे यांचे कडे पालकांनी तक्रार करून पालकांनी मुख्याध्यापिकेच्या तातडीने बदलीची मागणी केली असता त्यांनी शिक्षण अधिकारी जळगाव आणि गट शिक्षण अधिकारी यावल यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी हिंगोणा येथे भेट देऊन विद्यार्थिनी आणि पालकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. आणि तातडीने निर्णय घेऊन मुख्याध्यापिकांची तात्पुरती बदली केली असून, सपना सपकाळे यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता भार सोपवण्यात आला आहे. त्या नंतर मात्र शाळेचे कुलूप उघडण्यात आले. या घटनेमुळे शाळेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही संतप्त पालकांकडून केली जात आहे. मुख्याध्यापिके कडूनच लहान लहान विद्यार्थिनींना अश्लील भाषा वापरली जात असेल तर त्यांच्या बुद्धिमत्तेवर खआय परिणाम होत असतील.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा