महिला तलाठ्यासह खाजगी पंन्टर एसीबी च्या जाळ्यात, ४ हजारांची लाच भोवली
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी ८००० रुपयांची लाच मागून तडजोडी अंती ४००० रुपये घेणाऱ्या महिला तलाठी विशाखा भास्कर गोसावी ,वय ३७ वर्षे , व्यवसाय- नोकरी तलाठी, शेलु सजा तालुका चांदवड जिल्हा नाशिक. व खाजगी इसम / पंन्टर ज्ञानेश्वर एकनाथ बरकले वय ३४ वर्षे, व्यवसाय- खाजगी एजंट, रा. परसुल ता. चांदवड, जि. नाशिक. याना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
यातील तक्रारदार यांची वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या तळवाडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात ८०००/-रुपयांची मागणी ज्ञानेश्वर एकनाथ बरकले वय ३४ वर्षे, व्यवसाय- खाजगी एजंट, रा. परसुल ता. चांदवड, जि. नाशिक. यांनी करून तडजोड अंती
विशाखा भास्कर गोसावी ,वय ३७ वर्षे , व्यवसाय- नोकरी तलाठी, शेलु सजा तालुका चांदवड जिल्हा नाशिक.
यांचे संमतीने ८००० रुपयाची लाच मागणी करून तडजोडीअंती ४००० रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली .
या संदर्भात विशाखा भास्कर गोसावी ,वय ३७ वर्षे , व्यवसाय- नोकरी तलाठी, शेलु सजा तालुका चांदवड जिल्हा नाशिक. रा. आर्यवर्त सोसायटी, महाराणा प्रताप चौक, सिडको नाशिक शहर. आणि ज्ञानेश्वर एकनाथ बरकले वय ३४ वर्षे, व्यवसाय- खाजगी एजंट, रा. परसुल ता. चांदवड, जि. नाशिक. यांचे विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, तालुका चांदवड जि. नाशिक येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७अ ,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू आहे.
सदरची यशस्वी कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक. सापळा अधिकारी व तपास अधिकारी संतोष पैलकर, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक . पो.हे.कॉ./दिनेश खैरनार, अविनाश पवार चालक-पोलीस शिपाई परशुराम जाधव यांनी केली.