जिल्हा परिषद मराठी शाळा पाडळसे येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न
पाडळसे,ता. यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा पाडळसे येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम १ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला त्यात लेझीम पथक, देशभक्तीपर गीते सादर करणाऱ्या एकूण २५ मुले व मुली यांना गावकऱ्यांकडून मिळालेल्या देणगीतून मान्यवरांच्या हस्ते पॅड व पेन बक्षीस देण्यात आले.
तसेच कर्मचारी व अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तसेच नृत्य स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मंगेश पांडुरंग पाटील व ज्योती गुलाबराव सनेर या शिक्षक दांपत्याचा शाळा व्यवस्थापन समिती मुलींच्या शाळेचे अध्यक्ष प्रकाश तायडे व मुलांचे शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खेमचंद कोळी,पोलीस पाटील सुरेश खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जितेंद्र फिरके सर यांनी केले तर कार्यक्रमास श्रीमती वंदना पाटील, ज्योती सनेर,सुनील पाटील, ज्योती पाटील, जितेंद्र फिरके ,सीमा जावळे ,मंगलेश पाटील ,गणेश कोळी ,कांचन फेगडे .आदी शिक्षकांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.