क्राईमरावेर

मोठे वाघोदा येथे घराचे कुलूप तोडून ३ लाखाचा ऐवज लपास

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी- आशीष चौधरी | रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातून सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

मोठे वाघोदा येथील यशवंत नगर मधील रहिवासी सुनील वामन मानकरे हे दि. २५/३/२५ रोजी बहिणी कडे खामणी येथे द्वारदर्शणा साठी मुक्कामी गेले होते. दाराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरम्यान मानकरे हे बाहेर जाताना घाई गर्दी मध्ये कपाटाची चाबी कपाटालाच विसरलेभोते. चाबी कपाटात राहिल्याने चोरट्यांना आयतेच फावले.

२५ गॅम सोने, चांदी, व हरबरा विकून आलेले २० हजार रोख,
घरातील किराणा सामान असा अंदाजे ३ लाख रूपये चा ऐवज चोरट्यांनी लपास केला. इतकेच काय चोरट्यांनी घरात चहा बनवून ही पिला, व मागील दाराचे कुलुप तोडून पसार झाले. चोरींच्या घटने मुळे परिसरात घबराट पसरली आहे.

मानकरे हे खामणी म. प्र.येथे रात्री उशिर झाल्याने ते तेथे मुक्कामी राहिले होते. ते दि. २६ रोजी सायंकाळी घरी परत आल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याच परिसरात आणखी दोन ठिकाणी घरांचे कुलुपे तोडली असल्याची माहिती मिळत असून पोलीसानी रात्री ची ग्रंस्त वाढवावी अशी मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!