मुक्ताईनगर मध्ये भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा तर्फे सरकार विरोधात निदर्शने
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मध्ये भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या निमित्त सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय बिछडावर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने ईव्हीएम च्या विरोधात, बुद्धगया महाविहारावर ब्राम्हणांनी केलेल्या कब्जाच्या विरोधात,वक्फ बिलच्या विरोधात, अमित शहा ने बाबासाहेबांच्या संदर्भात अपमानजनक शब्द वापरल्याच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या सन्मानात मुक्ताईनगर शहरात भारत मुक्ती मोर्चा द्वारे भारत बंद अंतर्गत प्रवर्तन चौकात निदर्शने,जेलभरो आंदोलन करण्यात आले.
बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक प्रमोद सौंदळे तसेच भारत मुक्ती मोर्चा चे नितिन गाढे यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात हे आंदोलन करण्यात आले, जवळपास दोन तास सलग घोषणाबाजी करण्यात आली, महामानवाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली,शेवटी सर्व आंदोलकांना मुक्ताईनगर पोलिस पथकाद्वारे डिटेन करण्यात आले व पोलीस स्टेशन जेलमध्ये या आंदोलनांचे समापन झाले.
या आंदोलनात राजु वानखेडे,अरुण जाधव, सिद्धार्थ हिरोळे, इरफान बागवान,जाकिर शेख,फिरोज खान, इम्रान पटेल,सुपडा हिरोळे, महेश तायडे, उमेश गाढे, दाऊद खान,कासम शहा, अतुल अटकाळे, जितेंद्र हिरोळे, योगेश हिरोळे, ब्रिजलाल इंगळे,जमिर बागवान, मुस्लिम मणियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष हकिम चौधरी व असंख्य क्रांतिकारक उपस्थित होते.

