अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत डेंग्यू प्रतिरोध बाबत जनजागृती
चोपडा. मंडे टू मंडे न्युज नेटवर्कl जिल्ह्याभरात १ जुलै ते ३१ जुलै हा डेंग्यू प्रतिरोध जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. त्या नुसार जिल्हा आरोग्य अधिकारी- डॉ.सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार..तथा तालुका आरोग्य अधिकारी- डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, चोपडा तालुक्यासह अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये “डेंग्यू प्रतिरोध” विषयी जनजागृती करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने अडावद येथील…सार्वजनिक खाजगी प्राथमिक शाळा तथा माध्यमिक विद्यालय अडावद मधील.. शालेय विद्यार्थ्यांना किटकजन्य आजारात, डासांपासून होणारा प्रामुख्याने डेंग्यू या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली.
उपस्थित विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे डेंग्यू या आजाराविषयी शंका निरसन करून, डेंग्यू आजार होऊ नये यासाठी कोण कोणत्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येतात, याविषयी माहिती दिली. डेंग्यूचे डासांची पैदास ही साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने घरातील हौद,रांजण, टाक्या आठवड्यातून एक दिवस कोरड्या ठेवणे, टाक्यांना घट्ट फडक्याने बांधणे, फुलझाडे, कुलर, टायर, गच्चीवरील भंगार सामान इत्यादी गोष्टी मध्ये पाणी साचू देऊ नये, आणि डेंग्यू आजरामध्ये कोण कोणती चिन्हे-लक्षणे दिसून येतात, व त्यावर औषधोपचार करण्या साठी तात्काळ शासकीय दवाखान्यात जाऊन रक्ताच्या तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने, लवकरात-लवकर उपचार करण्याबाबत, अडावद आरोग्य केंद्राकडुन सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले..
यात प्र.आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, यशवंत पाटिल, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल गवांडे, औषध निर्माण अधिकारी-विजया गावित, आरोग्य सहायिका-शोभा चौधरी, प्रयोग शाळा तंत्रज्ञ-पायल गोसावी, आरोग्य सेवक-संतोष भांडवलकर,आर.एस.पाटील, कैलास बडगुजर, गट प्रवर्तक-संध्या बोरसे, धुडकु वारडे, सरगम ओस्तवाल, नारायण खजूरे, सचिन महाजन, सुनील महाजन, राहुल पाटील, दिलीप पाटील, आशा सेविका-संध्या चव्हाण, प्रतिभा धोबी, शोभा गायकवाड, शारदा माळी, ज्योती साळुंखे, योगिता गायकवाड, हिराबाई माळी आदींनी सहभाग नोंदवला.
तसेच तालुका हिवताप पर्यवेक्षक-परेश जोशी, जगदीश बाविस्कर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाला… सार्वजनिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक- किशोर साळुंखे, शिक्षक-अरुण विसावे सर, श्रीम.अर्चना चौधरी,श्रीम.संगीता निकुंभ.. सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक-अशोक कदम सर, आर.टी. मोरे आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याबद्दल..शेवटी सर्वांचे आभार विजय देशमुख यांनी मानले.