आजही अतिवृष्टीचा इशारा ” या ” जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट जारी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,वृत्तसंस्था। बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. गेल्या ४८ तासांत ओडिशा व अनेक राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला आहे, महाराष्ट्रातील काही भागात देखील परतीचा पाऊस कोसळला आहे.राज्यात आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान IMD ने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र भागातील काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
यावर्षी महाराष्ट्र राज्यातून एक दिवस आधीच परतीला गेला असून परतीच्या पावसाने राज्यात काही ठिकाणी कोसळधार केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे. राज्यात काल अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
आज १७ तारखेला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
जळगाव,नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली,चंद्रपूर, नागपूर, वर्धा, हिंगोली,या जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘येलो’ अलर्ट जारी केला आहे.