भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावमहाराष्ट्र

BHR प्रकरणी जळगाव भाजपचे आमदार पोलिसांच्या रडारवर

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

पुणे, समीर देशमुख | जळगाव भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते पोलिसांच्या रडारवर आहे.

जळगाव येथीलचंदुलाल पटेल हे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. दरम्यान चंदूलाल पटेल यांचे नाव समोर आल्यानंतर गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अटक वॉरंट घेऊन जळगावात गेले होते. पण याचा सुगावा लागल्यानंतर ते पसार झाले होते. त्यानंतर शोध घेत असताना कंडारेचा शोध लागला आणि त्याला अटक केली. मात्र आमदार पटेल पसार झाले. त्यांचे लोकेशन इंदोर येथे आल्यानंतर पथक त्याही ठिकाणी गेले होते. मात्र तेथून ते कारने पसार झाले. त्यानंतर त्यांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी तपासा कार्यात ज्या पद्धतीने वेगवान प्रगती होऊन दिग्गजांना अटक झालेली आहे, त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढलेली असून भविष्यात संशयीतांचे अटकसत्र सुरू झाल्यास त्यामुळे येणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठा भूकंप होऊन याचा निवडणूकीवर परीणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात जळगाव येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्यांचा पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस गेल्या पंधरा दिवसांपासून शोध घेत आहे. त्यांचे नाव समोर आल्याने जळगाव जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडालेली आहे.

दरम्यान, या आधी जळगावमधील मोठ्या राजकीय नेत्यांची नावे BHR घोटाळ्याशी जोडली जात होती. आता या घोटाळ्याप्रकरणी आमदार चंदूलाल पटेल यांचे नाव समोर आलेले आहे. गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तब्बल 15 जणांचे अटक वॉरंट घेऊन जळगावात दाखल झाले होते. त्यात आमदार पटेल यांचेही अटक वॉरंट होते. पण, यावेळी ते पसार झाले. त्यानंतर त्यांचा शोध घेत असताना कंडारेचा शोध लागला आणि त्याला अटक केली. मात्र आमदार पटेल पसार झाले. त्यांचं लोकेशन इंदोर येथे आल्यानंतर पथक त्याही ठिकाणी गेले होते. मात्र तेथून ते कारने पसार झाले. त्यानंतर त्यांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. आमदार पटेल यांच नाव समोर आल्याने मात्र जळगावसह राज्यात खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यातील आणखी काही दिग्गज राजकारणी BHR घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती समोर आलेली आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला जितेंद्र कंडारे हा पकडला गेल्याने तो आता पोलिस चौकशीत तोंड उघडू लागल्याने अनेक दिग्गजांची धाकधूक वाढलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!