भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

उच्चशिक्षित तरुणीवर दोघांचा बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करत पीडितेला धमकावलं

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे ,वृत्तसंस्था। राज्यात दिवसेंदिवस अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत आहेत. एकीकडे पुण्यातील बिबवेवाडी परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती हे प्रकरण ताजे असताना पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर, गुगल पेवरून पेमेंट करत असताना पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. यातूनच आरोपीनं पीडित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. यानंतर आरोपीने आपल्या अन्य एका मित्राच्या मदतीने पीडित तरुणीवर अत्याचार केला आहे. तसेच नराधमांनी अत्याचार करताना व्हिडीओ देखील आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला होता. आरोपींच्या अन्य एक मित्राने हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलकरत पीडितेला धमकावलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे घटना ?
विकी ऊर्फ विकास विनायक राठोड (वय-21, पैठण), निखिल प्रताप पाटील (वय-31, लातूर) आणि अमर गोरखनाथ राठोड (वय-23, पैठण) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पीडित तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी विकी आणि निखिलने अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. आरोपी विकी आणि निखिल हे काही दिवसांपूर्वी नोकरीच्या शोधात पुण्यात आले होते. तसेच आरोपी विकीने अत्याचार केल्याचा व्हिडीओ आपला गावाकडील मित्र अमर राठोडला पाठवला होता. त्यानंतर आरोपी अमरने संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत पीडितेला धमकी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तर पीडित तरुणी आपल्या उच्च शिक्षणासाठी काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. येथील एका खाजगी हॉस्टेलमध्ये ती वास्तव्याला आहे.

दरम्यान रविवारी खानावळ बंद असल्याने पीडित तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत जंगली महाराज रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. याठिकाणी जेवण केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी तरुणीकडे गुगल पे नव्हतं, त्यामुळे तिने याठिकाणी जेवायला आलेल्या विकीला पेमेंट करण्याची विनंती केली. यातूनच दोघांची मैत्री झाली. तसेच दोघांनी एकमेकांचे मोबाइल नंबरही घेतले. यानंतर आरोपी विकी आणि त्याचा मित्र निखिलने तरुणीशी जवळीक वाढत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!