भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग ; बाजार समितीच्या संचालकांना तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा बोनस

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे,वृत्तसंस्था। राज्यातील बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सध्याच्या संचालक मंडळास तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा आदेश राज्याचे सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांच्या सहीने काढण्यात आला आहे.

दरम्यान, जुन्याच संचालक मंडळांना मुदतवाढ मिळाल्याने संचालक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

याबाबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर बाजार समितीच्या मतदार यादीवर आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. त्यबाबत देण्यात आलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका घेण्यापूर्वी अगोदर गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुका घेण्याचे म्हटलेले आहे. त्यानुसार जोपर्यंत गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होत नाही; तोपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांना २३ जानेवारीपासून पुढील तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुदतवाढीच्या काळात बाजार समितीच्या संचालकांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. तथापि विशिष्ट परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, तर राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक असणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पुण्याचे पणन विभागाचे संचालक यांच्यामार्फत राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे, असे आदेशात स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील संचालक मंडळांना आणखी तीन महिने मुदतवाढ मिळाली हे मात्र नक्की, कोरोनामुळे महाराष्ट्र कृषी पणन अधिनियम 1963 कलम 59 मधील तरतुदींनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!