दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू कराव्यात, असे मत वैद्यकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र महाविद्यालये सुरू करताना करोना नियमांचे पालन करण्याबरोबर ज्या विद्यार्थी-शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, “शाळा सुरू करण्याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊनच टास्क फोर्सने दिवाळीनंतरच शाळा सुरू कराव्यात, अशी सूचना केली आहे. मात्र महाविद्यालय सुरू करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. काही संस्थांचालक आणि पालक यांची देखील मागणी आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि अन्य कर्मचारी यांचे देखील लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा महाविद्यालयांना सर्व नियम पाळून परवानगी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.’