भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंतची मोठी कारवाई, तब्बल 20 कोटींचा एम.डी. जप्त

पुणे (वृत्तसंस्था)। अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा शोध सुरू असताना मोठं ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आलं. देशात ड्रग्जवर बंदी असली तरी छुप्या पद्धतीने जागोजागी सप्लाय सुरूच आहे. पण बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा सापळा समोर आल्यानंतर आता पुण्यातही अंमली पदार्थ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

चाकणजवळ शेल पिंपळगावमध्ये पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं विक्रीसाठी आणलेला 20 कोटी रूपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शहरातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या माल नेमका कुठून येत आहे आणि याची खरेदी-विक्री कोण करत आहे याचा आता पोलीस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. काहीजण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी शेल पिंपळगाव इथं येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून पोलिसांनी 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच पाच लाख रुपये किमतीची कार आणि 23 हजार 100 रुपयांची रोकड असा एकूण 20 कोटी पाच लाख 23 हजार 100 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. तब्बल 28 दिवसांनंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा (Showik Chakraborty) जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावला. शौविक ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा (Drugs Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!