भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रसामाजिक

शिवभक्तांनी लढाई जिंकली, संभाजी बिडी कंपनीच्या मालकावर गुन्हा नोंद !

पुणे (वृत्तसंस्था)। छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने गेल्या कित्येक वर्षांपासून बिडी विकणाऱ्या कंपनीला अखेर दणका बसला आहे. संभाजी बिडीचे उत्पादन करणाऱ्या  पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक साबळे-वाघिरे ग्रुपवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बिडीचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीच्या विरोधात शिवभक्तांनी राज्यभरात आंदोलन पुकारले होते. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे.

महापुरुषांचा अवमान केल्याची शिवधर्म फाउंडेशनने तक्रार दाखल केली होती. या संघटनेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुरंदर किल्याच्या पायथ्याशी शिवभक्तांनी आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संघटना पुढे सरसावल्या आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी बिडी घेऊन जाणाऱ्या ट्रकची तोडफोडही करण्यात आली होती. मराठा आरक्षण कृती समिती, आखिल भारतीय मराठा सेवा संघ, शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे, सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन, आखिल भारतीय होलार समाज संघटना, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना शिवशंभू स्वराज्य संघटना, अशा अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसंच, संभाजी बिडीचे नावं बदला नाही तर दहा दिवसात कंपनी पेटवून देऊ, असा इशारा मराठा आरक्षण कृती समितीने दिला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!