भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्रराजकीय

खेवलकरांना अडकवण्यासाठी ईशा सिंगचा वापर, विकलाचा युक्तिवाद; रोहिणी खडसे वकिली पेशात न्यायालयात !

पुणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क : पुणे पोलिसांनी खराडी भागात छापेमारी करून चालू असलेल्या पार्टीवर कारवाई करत रेव्ह पार्टीचा गुन्हा दाखल करत या पार्टीतून नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज या प्रकरणाची सुनावणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणीला एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे वकीली कोट घालून हजर होत्या. तर, प्रांजल खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी खेवलकर यांना अडकवण्यासाठी ईशा सिंगचा वापर केल्याचा युक्तिवाद केला आहे.  यावेळी प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी एका मुलीच्या नावाचा उल्लेख केला आहे. या तरुणीला कुणी आणि का पाठवलं, याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

ड्रग्स प्रकरणात प्रांजल खेलवालकर आणि इतर सहा आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे.  न्यायालयाने मागे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज शिवाजीनगर न्यायालयात आरोपींनी हजर करण्यात आलं. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. पण यावेळी प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी इशा सिंग नावाच्या तरुणीचा उल्लेख करण्यात आला. ही तरुणी पार्टीमध्ये आली होती. या इशाच्या बॅगमध्ये गांजा सापडला होता. या तरुणीने  प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी प्लान केला गेला होता, असा दावा खेवलकरांच्या वकिलांनी केला. विशेष म्हणजे, रोहिणी खडसे स्वतः कोर्ट रूममध्ये दाखल आहे.  वकिली पोशाख घालून रोहिणी खडसे कोर्टात हजर होत्या.

पतीसाठी पत्नीची वकिलीचा कोट घालून कोर्टात हजर झाल्याचं चित्र आज न्यायालयात बघायला मिळालं आहे. पुणे पार्टी खेवलकर प्रकरणात 2 मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. स्वत:च्या पतीच्या सुनावणीसाठी वकिली पोशाख घालून रोहिणी खडसेन्यायालयात उभ्या राहिल्या. इशा सिंग नावाच्या महिलेचा वापर करुन कट रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. इशा सिंगकडे मादक द्रव्य सापडून तिला न्यायालयीन कोठडी आणि खेवलकरांना पोलीस कोठडी चुकीची असल्याचं डॉ. खेवलकराच्या वकीलानी युक्तिवाद केला आहे.

प्रांजल खेवलकर यांच्यासह सात आरोपींना पोलीस कोठडी संपल्याने पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात हजर करण्यात आलं आहे‌. या सुनावणीसाठी रोहिणी खडसे या स्वत: वकिलीचा कोट घालून न्यायालयात आल्या आहेत. त्या पती प्रांजल खेवलकर यांच्यासाठी न्यायालयात वकील म्हणून युक्तीवाद करण्याची शक्यता आहे. रोहिणी खडसे यांच्याकडे वकिलीची सनद आहे. रोहिणी खडसे यांच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या तथा पेशाने वकील असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे देखील वकिलीचा काळा कोट घालून युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात आल्या आहेत. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!