अल्पवयीन मुलीची अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
पुणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा। पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या व नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या बारावीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. श्रिया गुणेश पुरंदरे (वय १७) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीमधील डी १०३ या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या श्रियाला दहावीत तब्बल 95 टक्के गुण मिळाले होते. सध्या ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड सिटी मधुवंती सोसाय राहणाऱ्या अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी खाली पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली श्रिया त्यांना दिसली.
त्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी तातडीने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.