पुन्हा एकदा अजित पवार गायब? दौराही रद्द, चर्चेला उधाण
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती आहे. मात्र अजित पवार यांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी वेळेवर शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं.
अजित पवारांचा आज पुरंदर तालुक्याचा नियोजित दौरा असताना मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. तर काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले अन् आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यातल्या एका कार्यक्रमाचा दौरा त्यांनी अचानक रद्द केल्याने आता अजित पवार यावर कोणतं कारण देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.