भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

संतापजनक ; जन्मदात्या बापा कडून पोटच्या मुलीवरच वारंवार बलात्कार

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत असून बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत जन्मदात्या बापानेच आपल्या स्वतः च्या पोटच्या मुलीवर सतत बलात्कार केल्याची खडबडजनक तितकीच संतापजनक घटना समोर आली.

या बाबत अधिक माहिती अशी की,पुण्याच्या हडपसर परिसरात ६८ वर्षीय नराधम बापाने आपल्या पोटच्याच मुलीवर वारंवार बलात्कार केला. घरी कोणीही नसताना हा नराधम संधी साधत होता. विशेष म्हणजे त्याची पत्नी घरी नसताना तो त्याच्या मुलीवर अत्याचार करत होता. इतकेच नव्हे तर तिला या प्रकाराबद्दल कुणालाही सांगू नये, अशी धमकीही देत होता. अखेर नराधम बापाच्या अत्याचारा कंटाळून पीडित मुलीने घडलेला संतापजनक प्रकार आपल्या आईला सांगितला.या बाबत पोलिसात तक्रार केल्याने पुण्यातील हडपसर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!