मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कोर्टात अर्ज दाखल, काय आहे प्रकरण?
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील सभेत माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्गा, सांगलीतील मशीद आणि मशिदीवरील भोग्यांसंदर्भात मुद्दा उपस्थित केला. माहीम खाडीतील दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाई केली. माहीम पाठोपाठ सांगलीतही कारवाई झाली.
परंतु दुसरीकडे राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पुणे शहरात आधी तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर आता कोर्टातही तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर वाजिद सय्यद यांनी पिंपरीच्या मोरवाडी कोर्टातही राज ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याचं त्याचबरोबर हिंदू मुस्लिम संघर्ष उभा राहण्याची शक्यता असल्याचा आरोप सय्यद यांनी या अर्जात केला आहे.