भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षण क्षेत्रासाठी मोठी बातमी ; राज्यांमधील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती न्यायालयाने उठवली

पुणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाची व चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंदी असलेल्या भरतीला आता परवानगी मिळाली आहे. शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर दिलेली स्थगिती मुंबई हायकोर्टाने उठवली आहे. यामुळे राज्यात आता शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अपुऱ्या संख्येमुळे कामाचा शिक्षकेतरांवर प्रचंड ताण होता. परंतु मागील पाच वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी नव्हती. राज्यातील शाळांमध्ये १५ हजारांपेक्षा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. २८ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयास असलेली बंदी न्यायालयाने पूर्णतः उठविली आहे. यामुळे राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होणार आहे.

पदोन्नती सरळ सेवा भरती
शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आकृतिबंधाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरतीवर तात्पुरती स्थगिती दिली होती. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठवल्यामुळे आता लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून नव्याने सरळ सेवा भरती होणार आहे. तसेच यामुळे आता पदोन्नतीचा मार्गही मोकळा झाला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

शिक्षक भरतीला मिळाला अखेर मुहूर्त
राज्यात शिक्षक भरतीला अखेर लागला मुहूर्त मिळाला आहे. सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये २१,६७८ शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यात ५७१ जागा भरल्या जाणार आहेत. राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती होणार आहे. डीएड आणि पत्रातधारक उमेदवारांसाठी मोठी संधी यामुळे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!