भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

१० वी १२ वी च्या निकालाबाबत मोठी बातमी, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याबाबची विचारणा राज्य मंडळ विभागीय मंडळाकडे सातत्याने होत आहे.अशातच निकालाबाबत एक मोठी बातमी समोर आलीय.

केव्हा लागणार निकाल?
राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी सध्या सुरू असून या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

याच दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होईल. तसंच निकालाबाबत लवकरच अधिकृतपणे माहिती देण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती. २ ते २५ मार्च या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. दहावीच्या परीक्षेला सुमारे १६ लाख विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झाली होती. २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत १४ लाख विद्यार्थी बसले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!