भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

दहावीच्या निकाला संदर्भात एक मोठी बातमी

पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वी परीक्षेचा निकाल लागला. त्यांनतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीच्या निकालाची आतुरतेने वाट पहिली जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, दहावीच्या निकाला संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल आता जून महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे ७ जून २०२३ पर्यंत महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या संदर्भात अधिकारीक घोषणा करण्यात आलेली नाही.

पण लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हा निकाल जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल कुठे पाहता येऊ शकतो? या संदर्भात आता आपण जाणून घेऊया.

कुठं पाहता येणार निकाल?
अद्याप दहावी बोर्डाचा रिझल्ट लागलेला नाही मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा रिझल्ट लागणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम वर नमूद केलेल्या संकेतस्थळापैकी कोणत्याही एका संकेतस्थळाला विद्यार्थ्यांना भेट द्यावी लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी एसएससी रिझल्ट २०२३ असा पर्याय दिसेल. यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपला सीट क्रमांक म्हणजेच आसन क्रमांक आणि आपल्या आईचे नाव प्रविष्ट करावे लागणार आहे. ही माहिती इंटर केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला दहावी बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे तसेच या निकालाची प्रिंट आउट देखील घेता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!