दहावी, बारावीचे बोगस प्रमाणपत्र ६० हजारात, दोघाना अटक
पुणे ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. बनावट बेवसाइट तयार करुन दहावी, बारावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या दोन बड्या एजंटांना घेतलं ताब्यात घेतले आहे. राज्यात बोगस प्रमाणपत्र देणारे १५ एजंट होते.
राज्यात टीईटी घोटाळा (TET Scam) सारखा मोठा शैक्षणिक घोटाळा नुकताच उघड झाला होता. टीईटी घोटाळ्यानंतर शिक्षण क्षेत्राला बसलेले हादरे शांत होत नाही, तोपर्यंत पुन्हा नवीन घोटाळा समोर आला आहे. टीईटी प्रकरणात अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करत ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा करत नोकरी मिळवली होती. त्यानंतर आता दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा प्रकार उघड झाला आहे. एक बनावट वेबसाइट उघडून विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्र दिली जात असल्याचा प्रकारणात पुणे पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी दोन बड्या एजंटांना अटक केली आहे.
कोणावर केली कारवाई
पुणे शहरात बोगस सर्टिफिकेट वाटणारी टोळीचा आर्थिक गुन्हे शाखेनं केला पर्दाफाश केला होता. पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी होती. महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट बेवसाइट या टोळीने बनवली होती. त्या माध्यमातून तब्बल २ हजार ७३९ दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्रे वाटल्याचा प्रकार उघड झाला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी जमाल शेख आणि महेश विश्वकर्मा यो दोन बड्या एजंटांना अटक केली आहे. या दोघांना चांदीवलीतून अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
दहावी, बारावीत नापास झालेल्यांना बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्याने ६० हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र मिळेल, असे सांगितले. बनावट ग्राहकाने काही रक्कम त्याला दिली व उर्वरित रक्कम घेण्यासाठी आला असताना पोलिसांनी सापळा रचून पकडले. पोलिसांनी कांबळे यांची चौकशी केली. त्यात कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख व सय्यद इम्रान यांची नावे उघड झाली. त्यांना अटक केली आहे. राज्यात या लोकांनी १५ एजंट नियुक्त केले होते. या प्रकरणाचा तपास अजून सुरु असून आणखी काही जणांना लवकरच अटक होणार आहे.