भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र तसेच गोवा याठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पावसाळी ढगही याठिकाणी निदर्शनास आल्याचे हवामान विभागाने सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. तसेच पुण्यातील घाट परिसरात तसेच सातारा या भागातही पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने याआधी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस तसेच मेघगर्जनेची शक्यता वर्तवली होती. तर १९ ते २१ मार्च या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात अनेक भागात तापमानाच्या पाऱ्याने ४० डिग्री सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. तर सांगली, कोल्हापूर येथे पावसाचे वातावरण तयार झाले आहे. याठिकाणी तासभर हे पावसाचे राहतील असा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!