मोठी बातमी ; राज्यात ३ डिसेंबर नंतर दंगलीची शक्यता, खळबळजनक भाकीत
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। स्मृतिदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले वाड्यात आज २८ नोव्हेंबर रोजी महान समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला की, राज्यात अनेक ठिकाणी ३ डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता आहे. सगळ्या पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आला. दरम्यान, दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या संविधान सन्मान महासभेतही प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, २००४ मध्ये गोधरा झालं, २०२३ मध्ये मणिपूर झालं आता तीन डिसेंबरनंतर देशातील कोणत्या ना कोणत्या राज्यात नरसंहार होण्याची शक्यता वर्तविली होती.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात ३ डिसेंबर नंतर अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत ६ डिसेंबरनंतर काहीही घडू शकतं, अशी सुचना पोलिसांना देण्यात आली आहे. चार राज्यातील निवडणूका झाल्यानंतर घडेल. देशात मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात आहे. समाजात अशांतता पसरवली जात आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे ओबीसींनी सतर्क राहावे, असे आव्हान प्रकाश आंबेडकर केले आहे.