भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

अजित पवार गटातून मोठी बातमी, तब्बल १३७ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राजीनामा, घडलं काय नेमकं ?

पुणे,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क/ ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर एक मोठी बातमी समोर आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या ५ आणि ६ तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवणारं एक प्रकरण समोर आलं आहे. लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. याच नाराजीतून तब्बल १३७ कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या लोणावळा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह १३७ कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिलाय.

समजूत काढण्याचा प्रयत्न, पण…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही राजीनामा देणारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. “आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, आम्ही राजीनामा दिला आहे. २० ते २५ वर्ष झालं पक्षाच काम केलं, आम्हाला डावलून इतरांना संधी का?”, असा सवाल सर्वांनी केला आहे. लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी देण्यात आलीय. त्यांना काही अनुभव नाही असं असताना ही त्यांना संधी देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. “आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत होतो. आता मात्र आम्हाला निर्णय घ्यावा लागला. लवकरच पुढचं पाऊल उचणार आहोत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार”, अशी प्रतिक्रिया राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!