भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या बाथरूम मध्ये नेऊन नराधमाचा अत्याचार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अल्पवयीनमुलींसह महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुलींच्या शाळेत शिरुन एका नराधमाने अकरा वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्‍या एका ४० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षाची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकायला आहे. बुधवारी सकाळी ती शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करुन तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.

या घटनेनंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, शाळेत सीसीटीव्ही आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत. शाळेत कार्यरत असलेल्या कोणा पुरुषाचे हे काम नाही, याची तपासणी आम्ही केली आहे. हा आरोपी बाहेरचा असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक मनिषा जाधव अधिक तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!