हृदयद्रावक घटना ; अनैतिक संबंधामुळे प्रियकराने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या बाळाला उकळत्या पाण्यात टाकले पुढे काय घडले… ..
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतचं चालले आहे. राज्यात अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली,अनैतिक संबंधांमुळे प्रियकराने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात टाकले. उकळत्या पाण्यात टाकल्याने बाळाचे संपूर्ण शरीर भाजले आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात घडली.
अनैतिक संबंधातून गुन्हे घडणं हे काही नवीन नाही. पण याच अनैतिक संबंधांमुळे एका बाळाचं आयुष्य संपलं. पुण्यासारख्या शहरात प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात टाकले. उकळत्या पाण्यात टाकल्याने बाळाचे संपूर्ण शरीर भाजले आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू होणं ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.
चाकण पोलीस हद्दीत ही घटना घडली असून शरद विक्रम कोळेकर असं गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली असताना असे दिसून आले की, आरोपी आणि बाळाच्या आईचे अनैतिक संबंध होते. प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन बाळाला बाथरुमध्ये त्याचे हात पाय बांधून उकळत्या पाण्यात टाकले. बाळाचे संपूर्ण शरीर भाजले आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.
गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाईट असून ती फक्त थांबवणेच गरजेचं नाही तर ती नष्ट करायला हवी. पुण्यात सुरु असलेले हे प्रकार कधी थांबणार असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली असून आरोपी सध्या फरार आहे. फिर्यादीसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते. ज्यावेळीस ही घटना घडली तेव्हा फिर्यादी उपस्थित होत्या. त्यांनी तात्काळ बाळाला पाण्यातून काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु रुग्णालयात नेण्यापर्यंत फार उशीर झाला होता आणि उपचारादरम्यानच बाळाचा मृत्यू झाला. आता या परिस्थितीत पोलीस पुढे काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.