भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात “या” भागात मुसळधार पाऊस, राज्यात पाऊस परतणार

पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात यंदा मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाने काहीसा दिलासा दिला. आता सप्टेंबर महिन्यातील पावसावर शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. या पावसामुळे रब्बी हंगाम चांगला येईल आणि राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे. राज्यात दडी मारलेला पाऊस आता परतू लागला आहे. पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात या भागांत मुसळधार पाऊस
कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत जात आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात ४ सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत यलो अलर्ट जारी केला आहे, असे पुणे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितले.

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असणार आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे.

100 वर्षांत देशात अशी परिस्थिती
हवामान विभागाने मागील 100 वर्षांत प्रथमच ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याचे म्हटले आहे. पुणे आणि परिसरात ऑगस्टमध्ये 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात परिस्थिती बदलणार आहे. या महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आयएमडीचे हवामान शास्त्रज्ञ अनुप कश्यपी यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!