भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यातील १३ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु त्यात आता गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनाही शेती कशी करावी? हा प्रश्न या बदलांमुळे पडला आहे.

कुठे आहे ऑरेंज अलर्ट
राज्यातील जवळपास १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश याहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. या जिल्ह्यांत आज दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

गुरुवारनंतर शुक्रवारी ऑरेंज अलर्ट
गुरुवारी १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर शुक्रवारी १७ मार् चरोजी ९ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात अहमदनगर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. शनिवारी १८ मार्चपर्यंत राज्यातील ढगाळ वातावरण निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जळगाव जिल्ह्यात पाऊस
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात काल रात्री अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोनवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. शेतकऱ्यांचे हरभरा मका गहू या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लवकर पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

मुंबई उपनगरासह ठाण्यात देखील पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. नवी मुंबईत देखील ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजून दोन दिवस ढगाळ वातावरणात तसेच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!