आज ही राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, ‘”या'” जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
अकोला, बुलडाणा, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर जालना ,परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तसेच जळगाव, पालघर, मुंबई, ठाणे रायगड इथेही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
कोकण, मराठवाडा,मध्य महाराष्ट्र,विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काल रात्री पासून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवातही झाली आहे.परंतु मंगळवारपासून पावसाचा जोर पुन्हा कमी होण्यास सुरुवात होईल
जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोडपून काढले आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, रावेर,यावल भुसावल मुक्ताईनगर या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास २० ते २५ हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली आहे. यामुळे ३० टक्के मिरची खराब होण्याची शक्यता आहे. मिरची व्यापाऱ्यांचे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.