भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता ; राज्यातील बहुतांश भागात यलो अलर्ट

पुणे,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। पश्चिम महाराष्ट्रातून अवकाळीचा जोर ओसरलेला असतानाच आता उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र आता हा पाऊस थैमान घालण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील २४ तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाडयासह उत्तर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल अशा शक्यतेसह या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांची चक्राकार निर्माण झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांना अवकाळीचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळालं. पण, आता मात्र केरळच्या उत्तर भागापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा विरून गेला ज्यामुळं काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला.

राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे. राज्यात १ आणि २ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. १ डिसेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस
उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहरातही आज पावसाची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!