भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यात डॉक्टर महिलेच्या बेडरुम, बाथरुम तसेच मोबाईल चार्जर आणि LED बल्बमध्ये छुपे कॅमेरे

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

पुणे, समीर देशमुख : भारती विद्यापिठाच्या कॉर्टर्समध्ये राहत असलेल्या महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममधून तसेच मोबाईल चार्जर आणि LED बल्ब मध्येछुपे कॅमेरे लावत खाजगी आयुष्याच्या चित्रीकरणाच्या प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भारती विद्यापिठाच्या कॅम्पसमध्ये असणाऱ्या कॉटर्समध्ये राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिला डॉक्टर नेहमीप्रमाणे ६ जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास कामावर गेल्या. संध्याकाळी त्या पुन्हा रुममध्ये आल्यानंतर त्यांना त्यांच्या रुममध्ये काही तरी संशयास्पद वाटले म्हणून त्यांनी संपूर्ण रुम चेक केला. तेव्हा त्यांना रुमच्या एका कोपऱ्यात लाल लाईट चमकतान दिसली. त्यांच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये अशाप्रकारची लाईट चमकत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्वरीत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुम मध्ये छुपे कॅमेरे असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे पोलिसांनी संपूर्ण रुमची तपासणी केली असता त्यांना मोबाईल चार्जर आणि LED बल्बमध्ये देखील छुपे कॅमेरे असल्याचे आढळून आले. पोलिसांकडून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहात.

या संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टर महिलेला मोठा धक्का बसला. डॉक्टर महिलेच्या रुममध्ये अशाप्रकारचे छुपे कॅमेरे आले कुठून? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. महिलेच्या रुमला लॉक असताना कॅमेरे लावण्यासाठी आरोपी रुममध्ये गेला कसा? अशाप्रकारचे छुपे कॅमेरे लावून महिलांच्या खासगी आयुष्याचे चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणार मोठे रॅकेट काम करत आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!