संतापजनक; मुलगी एकटी बघुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, प्रकृती गंभीर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन – पुणे :
राज्यात दिवसेंदिवस महिला आणि अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. पुण्यात विमाननगरमधील एका हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने एक अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची खात्री करुन ५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील लेबर कॅम्प परिसरातील एका हॉटेलमध्ये करण दिलीपकुमार गोस्वामी (वय २०) हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो याने तिथेच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे आई-वडील कामावर गेल्याचे हेरुन आरोपी करणने चिमुरडीला घराबाहेर बोलवले आणि चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये घेऊन गेला. याच ठिकाणी नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे. तर पिडित अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचास सुरु आहेत. या मुलीची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.