भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

मराठी अभिनेत्रीवर बलात्कार ; माजी आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. याप्रकरणी सोलापुरातील विराज पाटील या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून विशेष महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

32 वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिल्याने आरोपी विराज रविकांत पाटील, वय 35, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर. याच्याविरुद्ध विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्कार, तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी आयपीसी 376, 376(2)(एन), 377, 323, 504, 506, सह आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला.

पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटात काम केले आहे. अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. सोशल मीडियातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. आरोपी हा विवाहित असून पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते. मात्र त्यानंतर त्याने लग्नाबाबत विचारले असता तरुणीला धमकावले. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपी पीडित तरुणीला टाळू लागला. त्यामुळे फिर्यादी तरुणीने विराजकडे याबाबत विचारणा केली व मला तुझ्या घरच्यांना का भेटवत नाही, त्यावर विराज पाटीलने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर जवळ असलेली पिस्टल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तू जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आहे, अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. माजी आमदार रविकांत पाटील यांचा विराज हा पुत्र आहे. रविकांत पाटील हे कर्नाटकमधील इंडी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. तसेच सोलापूरातून त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!