आई- मुलाच्या नात्याला काळिमा! मूलाकडूनच आईकडे शरीरसुखाची मागणी
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मनोविकृत अट्टल दारुड्या मुलाने आपल्याच आईकडे शरीरसुखाची मागणी करून नात्याची हद्दच पार केली ,इतकेच नाही तर लहान मुलिवर देखील लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न देखील केला.ही घटना पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली.
दारूच्या नशेत आरोपीने स्वतःच्या आईकडेच शरीर सुखाची मागणी केली होती. एवढ्यावरच आरोपी न थांबता सोबतच पीडित आईच्या अल्पयीन मुलीवर नातीची पँट काढून देखील लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे मुलाच्या या विकृत मानसिकतेने पीडित आईला मोठा धक्का बसला असून आईनेच स्वतःच्या मुलाविरोधात निगडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहून निगडी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.