भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

वारकऱ्यांसाठी नरेंद्र मोदींची मोठी घोषणा,पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी

देहू,पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन त्याच्या हस्ते होऊन त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेल्या वैष्णव सभेत केलेल्या भाषणामुळे उपस्थित वारकरी मंडळी मंत्रमुग्ध झाले. तसेच, त्यांनी यावेळी ११ हजार कोटींचा निधी रस्ता पालखी मार्गासाठी देणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली. या घोषणेचं उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.

श्री विठ्ठलाय नमः म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली. तसेच, त्यांनी यावेळी ११ हजार कोटींच्या महामार्गाची घोषणा केली. ते म्हणाले की, पालखी मार्गातील २ राष्ट्रीय राजमार्ग चारपदरी करण्याची संधी मला मिळाली. श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग ५ टप्पांत होईल. तर, तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यांत होईल. या सातही टप्प्यांतून ३५० किमीचा महामार्ग बनवण्यात येईल. यासाठी ११ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे क्षेत्रविकासाला गती मिळेल.

यावेळी त्यांनी देहूतील शिळा मंदिराची महती गायली. ते म्हणाले की, देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संत परंपरेला, भारतातील ऋषीमुनींना आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे. संतांचा सहवास लाभणं मनुष्यासाठी दुर्मिळ आहे. संतांची कृपा झाली म्हणजे देवाची कृपा झाली असं म्हटलं जातं. आज देहूच्या या पवित्र तीर्थ भूमीवर येत मला ही अनुभूती होत आहे. भारत शाश्वत आहे कारण भारत ही संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात देश आणि समाजाला दिशा देण्याकरता कोणी ना कोणी महत्त्मा जन्माला आला. आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करत आहे.

शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत केंद्र
या शिळेवर तुकाराम महाराज्यानी १३ दिवस तपस्या केली. ती शिळा फक्त शिळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शिळा आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. भारत शाश्वत आहे कारण संतांची भूमी आहे. प्रत्येकवेळी मार्गदर्शनसाठी इथे सत्परुष जन्माला आले आहेत. संत ज्ञानेश्वर समाधींचे ७२५ वर्ष आहे. यांच्यामुळेच भारत गतीशील आहे. बहिणाबाईंनी संत तुकारामांना संतांचे कळस म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, आपण आपल्या प्राचीन परंपरा जिवंत ठेवल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विकास आणि वारसा एकत्रपणे पुढे केले पाहिजे.

तुकारामांच्या अभंगांनी प्रेरणा दिली
तुकारामांनी दुष्काळ पाहिला, दुख पाहिले, भूकबळी पाहिले. संत तुकाराम त्यावेळी समाजासाठीच नव्हे तर भविष्यासाठी प्रकाश म्हणून राहिले. ही शिळा त्यांच्या वैराग्याची साक्ष आहे. तुकराम यांच्या अभंगात दया आणि करुणेचा ठेवा आहे. या अभंगांनी पिढ्यांन् पिढ्या प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही तोच अभंग. आजही देश जेव्हा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जातोय, त्यावेळी तुकारामांचे अभंग प्रेरणा, दिशा देतात. सर्व संतांच्या अभगांनी प्रेरणा मिळते. सार्थ अभंग गाथांनी संत परंपरेचे ५०० अभंग रचना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. जे का रंजले गांजले…
संत तुकाराम म्हणत उच्च-नीच माणनं हे पाप आहे. हा उपदेश तितका उपयुक्त धर्मासाठी तितकाच राष्ट्रभक्तीसाठीही आहेच. हाच संदेश घेऊन वारकरी दरवर्षी वारी करतो. त्यातूनच सरकारच्या योजनांचा लाभ विना भेदभाव सगळ्यांना मिळतो आहे. जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणजे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकारामांचा अभंग, जेव्हा तुम्ही शेवटच्या रांगेत बसलेल्यांचा विकास करणे, हाच अंत्योदय आहे. समाजातील सर्वात खालच्या स्तरातील सगळ्यांचे कल्याण हाच उद्देश आहे.

सर्व पिढीला प्रेरणा मिळाली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे. वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात तुकारामांचे अभंग गात असत. वेगवेगळ्या पिढीला तुकारामांचे अभंग प्रेरणा राहिलेल्या आहेत. आषाढात पंढरपूर यात्रा आता सुरु होणार आहे, या यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यात ठेवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत. मोदींनी केले सर्व संतांचे नामस्मरण
संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबा काका, संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत कबिर, संत सोपान देव, संत मुक्ताई अशा महाराष्ट्रातील सर्व संतांचं नामस्मरण यावेळी मोदींनी केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!