मोठी बातमी : परीक्षेत १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार १० मिनिटे जास्त वेळ
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात १२ वीच्या तर मार्च महिन्यात १० वीच्या परीक्षा होणार आहे. या परिक्षांच्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे अधिक वेळ मुलांना पेपर सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. यामुळे मुलांना मोठा फायदा होणार आहे.
परीक्षेची सध्याची वेळ परीक्षेची सुधारीत वेळ
सकाळी ११ ते दुपारी २ सकाळी ११ ते दुपारी २:१०
सकाळी ११ ते दुपारी १ सकाळी ११ ते १.१०
सकाळी ११ ते दुपारी १.३० सकाळी ११ ते दुपारी १.४०
प्रश्नपत्रिका मोबाईलवर त्याचप्रमाणे समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा समोर येत असतात. अशा प्रकारच्या घटना घडू नये त्याचप्रमाणे कॉपीमुक्त व भयुमक्त वातावरणात परीक्षा पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. मात्र पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात आला होता
फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांचा वेळी ही सकाळ सत्रास सकाळी ११.०० वाजता असते तर आता विद्यार्थ्यांना सकाळ सत्रात सकाळी ९.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागणार आहे. तर दुपार सत्रात दुपारी ३.३० वाजात असते तर आता विद्यार्थ्यांना आता २.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागणार आहे.
दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.