राज्यात पुढील तीन दिवस पाऊस सक्रिय राहाणार ; काय म्हणतं हवामान खातं
पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रात्रीपासूनच राज्यात अनेक भागात मान्सून अतिसक्रिय झाला आहे. नागपूरमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या शक्यते नुसार राज्यात पुन्हा पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजनुसार राज्यभरात मान्सून अतिसक्रिय असल्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार दि २४ पासून २९ सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
२४ आणि २५ सप्टेंबर रोजी मान्सून असणार आहे. तर २६ सप्टेंबरनंतर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि अरबी सुमद्रावर एक सिस्टीम तयार होण्याची शक्यता आहे. त्या सिस्टीमच्या प्रभावामुळे २६ सप्टेंबरपासून मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. पुढील तीन दिवसांत होणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहे.