भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

Raksha Bandhan ; राखी बांधताना किती गाठी मारणे असते शुभ? राखी “या” शुभ योग मुहूर्तावर बांधा

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या आरोग्यासाठी, आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. यावर्षी ११ ऑगस्ट २०२२ रोजी (गुरुवारी) रक्षाबंधन साजरे केले जाईल. धार्मिक मान्यतांनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी योग्य मुहूर्तावर राखी बांधणे शुभ मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया रक्षाबंधनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

तीन गाठी बांधणे मानले जाते शुभ
रक्षाबंधनाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा राखीच्या धाग्याच्या तीन गाठी बांधतात. धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते. तीन गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीशी संबंधित आहेत अशी मान्यता आहे.

राखी बांधताना भावांचे तोंड कोणत्या दिशेला असावे?
राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वत:च्या दीर्घायुष्यासाठी, तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते असे मानले जाते. त्यामुळे भावाला राखी बांधताना नेहमी तीन गाठी बांधणे शुभ असते. धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे.

११ ऑगस्ट २०२२ रोजी (गुरुवारी) सकाळी ०९:३५ पासून पौर्णिमा सुरू होत आहे. परंतु यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भाद्रा काळ आहे. ज्योतिषशास्त्रातील ‘शुभकरं पुच्छं एवम् वासरे शुभकारी रात्रौ’ या तत्त्वानुसार गुरुवारी सायंकाळी ०५:४० नंतर शुभ योग तयार होईल. १२ ऑगस्ट २०२२ रोजी भाद्रा नाही. परंतु पौर्णिमा फक्त सकाळी ०७:१६ पर्यंत आहे. त्यामुळे या दिवशीही रक्षाबन साजरे केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!