जन्मदात्या बापाकडूनच आपल्या स्वतःच्या बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जन्मदात्या नराधम बापाकडूनच आपल्या स्वतः च्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खडबडजनक दुर्दैवी घटना घडली .या घटनेनं बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासला गेला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, पीडित अल्पवयीन मुलीचा नराधम बाप दारूच्या नशेत घरी आला होता. त्यामुळे त्यानं पत्नीशी वाद घातला. त्यानंतर चिडलेल्या नराधम बापानं दारूच्या नशेत घरात झोपलेल्या पोटच्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला.या मुळे मोठी खडबड उडाली.
या नराधमाच्या कृत्यानंतर पीडित मुलीच्या आईनं परिसरात आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावलं.या बाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात नराधम पित्याविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. आता त्या नराधमावर स्थानिक नागरिकांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.