शरद पवार अजित पवार एकत्र, पवार कुटुंबीयांचं मनोमिलन?
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून गोविंदबागेत दिवाळीला हजर राहणार नसल्याचे एक प्रकारे स्पष्ट केलं होतं.
पण आज पुण्यात प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार आणि अजितदादा एकत्र आले होते. शरद पवार पोहोचल्यानंतर जवळपास अर्धा तास अजित पवार तिथेच होते.सुप्रिया सुळेही हजर होत्या, दिवाळीच्या निमित्ताने ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. पण या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.