धक्कादायक : “फी” न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ठेवलं कोंडून,शाळेचा अजब कारभार
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिक्षण क्षेत्रातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, पुण्यातील वाघोली परिसरात असणाऱ्या एका नामांकित अवस्थापनाने शाळेतील 30 ते 40 विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून वर्गात कोंडून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या विद्यार्थ्यांची शाळा दुपारी 1 वाजता या विद्यार्थ्यांची शाळा सुटते मात्र शाळा सुटल्यानंतर देखील काही मुलांना वर्गात 4 वाजेपर्यंत डांबून ठेवले होते असा आरोप विद्यार्थ्यांच्यां पालकांनी केला आहे. तर पालकांनी केलेल्या आरोपांचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
पालकांचा आरोप आहे की फी न भरल्यामुळे शाळेने विद्यार्थ्यांना शाळेतच बसून ठेवले तसेच त्यांना बसने घरी न पाठवता पालक जो पर्यंत येथे पैसे घेऊन शाळेत येत नाही तोपर्यंत मुलांना घरी सोडणार नाही, अशी धमकीवजा कॉल करून पालकांना मानसिक त्रास दिला असा गंभीर आरोप यावेळी केला.अशी बऱ्याच शाळांमध्ये फी करीता पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी पालकांनी केली. तर पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या समोर मांडली व्यथा मांडली मात्र मुख्याध्यापिका यावर बोलण्यास तयार नाही.