भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

TET Exam Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याप्रकरणी २९३ उमेदवारांवर कारवाईचे आदेश

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। TET शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण आता कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.२०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी सायबर स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२९ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यात हे कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, या गैरप्रकाराच्या तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी करताना असे निष्पन्न झाले की, ७८८० उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल आहेत. 

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल २८ ऑगस्ट २०२० रोजी परीक्षा परिषदेच्या स्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानुसार एकूण १६७०५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी अनेक उमेदवार गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. २९३ उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले असल्याचे यात समोर आले. तर उर्वरीत ८७ उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात होते, असे आढळून आलेले आहे.

परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, परीक्षा पात्र उमेदवारांच्या यादीत अनेक असेही उमेदवार होते, यांची नावे दोव वेळा पात्र उमेदवार म्हणून या यादीत नोंदवण्यात आली होती. यात ७८८० पैकी ६ उमेदवारांची नावे दोनदा नोंदवण्यात आल्याचं दिसून आलं आहे. याप्रकरणातील अनेक उमेदवारांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम १९९८ भाग २ प्रकरण ५ मधील कलम ८ उपनियम (२) (य) मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दोषी उमेदवारांवर शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!