भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रशैक्षणिक

TET Scam : टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांची होणार चौकशी, शिक्षकांमध्ये पुन्हा खळबळ

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील शिक्षकांच्या मानगुटीवरुन टीईटी घोटाळ्याचे भूत काही केल्या उतरताना दिसत नाही. टीईटी घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडून दिली होती. अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करत ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि नोकरी मिळवली असा दावा करण्यात आला होता. राज्य परीक्षा विभागाने तब्बल ८ हजार उमेदवारांची यादीच जाहीर केली होती. त्यानंतर आता आधी टीईटी घोटाळ्यात पुणे जिल्ह्यातील १७० शिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे, त्या नंतर राज्यातील शिक्षकांची, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.त्या मुळे बोगस शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर ८ हजार विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता यामधील पुण्यात कार्यरत काही शिक्षण सेवकांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. १७० शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिसांनी २०२१ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्याचे खोदकाम २०१९ आणि २०१८ पर्यंत करण्यात आले. यातील घोटाळ्याने शिक्षण क्षेत्र हादरले. अनेक मोठ्या लोकांची नावे या घोटाळ्यात असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील १७० शिक्षकांची नावे राज्य परीक्षा परिषेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारपासून या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कागदपत्रांआधारे सलग तीन दिवस ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये संबंधित शिक्षकाला देण्यात आलेले नियुक्ती आदेश, टीईटी उत्तीर्ण मूळ प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार . पहिल्या दिवशी ६० तर दुसऱ्या दिवशी तितक्याच आणि शेवटच्या दिवशी उर्वरीत शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. अशीच राज्यभरात चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!