भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

आज शाळेची पहिली घंटा वाजणार, आजपासून प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. 

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु होणार आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरु होतील. शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं. 

शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलंय. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात म्हटलंय. राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले. आदेशात शैक्षणिक सत्र 2022 – 23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आलेत.  शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार, राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!