भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार

पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुसळधार पावसाचा जोर राज्यभरात सोमवारी कायम होता. मंगळवारी सकाळपासून पुन्हा अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुणे, रत्नागिरी, ठाणे सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशात यलो अलर्ट दिला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर पश्चिमेकडे सरकणार आहे. त्यामुळे पश्चिम किनारी कोकण, विदर्भातील काही भाग, मराठवाडा आणि तेलंगणासह ओरिसाच्या काही भागात २५ ते २८ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट
पुण्यासह ठाणे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यात ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये देखील पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!