भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

जामनेर येथे सोमवारी युवासेना काढणार कापसाची अंत्ययात्रा…..

जामनेर, ता. जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शासन कापसाला भाव देतं नसल्याने शेतकऱ्यांना कापूस मिळेल त्या भावात विकावा लागत आहे, तर अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरातच असल्याने युवासेना (उद्धव ठाकरे गट)सोमवार दि- २९ मे रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयावर कापसाच्या अंत्ययात्रेचा मोर्चा नेत असल्याची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी दिली आहे.

त्यांनी तालुक्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की , आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, आपल्या खान्देश चे लाडके पीक, पांढरे सोनं – कापूस गेल्या सात महिन्यापासून भाव वाढ मिळेल याची वाट पाहत त्याने जागे वरचं दम सोडला आहे.
जगाचा पोशिंदा शेतकरी मायबापाने पोटाच्या गोळ्या प्रमाणे त्याची सेवा केली. त्याला लहान चे मोठे केले. किंबहुना मागील चार महिन्या पासून कापसाला रोगराई ने घेरले होते. संपूर्ण आंग खाजवत होते. अश्या मध्ये त्याला उज्ज्वल भविष्य येईल.माझा कापूस जगाची माय लेकिंची अब्रू झाकणारा म्हणून, अपेक्षेने त्याला गोजरले परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणास तो बळी पडला. त्याचा करून अंत झाला. त्यास जबाबदार महाराष्ट्र आणि भारत शासन आहे. बहुसंख्य “कापूस उत्पादक शेतकरी हिंदूच” आहेत. त्या मुळे शासनाच्या दारी आपल्याला हिंदू रिती-रिवाजा प्रमाणे कापसाची अंतयात्रा काढायची आहे.

तरी सर्व राजकीय हेवा-देवा, मतभेद, मान-सन्मान दूर सारून आपल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देत सर्व बांधवांनी शेतकऱ्यां प्रती आपली आत्मीयता, सद्भावना व सहानुभूती देण्या करता त्याला खंबीर साथ देत पाठबळ देण्यासाठी सरकारला जाग करण्यासाठी एकत्र येऊन निषद नोंदवण्याचे आवाहन राहूल भाऊ चव्हाण, नरेंद्र धुमाळ, विशाल भोई जामनेर तालुका युवासेना (उद्धव ठाकरे ) यांनी केले आहे. कापसाची अंतयात्रा सकाळीं- १०-०० वाजता राजमाता जिजाऊ चौक,नगरपालिका पासून तहसील कार्यालय पर्यत निघणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!