राज्यात आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुढील काही तासांसाठी राज्यभर वादळाचे इशारे देण्यात आले आहेत. राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व इतर राज्यात पावसाची शक्यता आहे.
राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनदर, छ. संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट दिला आहे
विदर्भात मंगळवारी गारपीटीचाही अंदाज होता.यासोबतच आज विदर्भात अनेक जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी विदर्भात गारपीटीचाही अंदाज होता. यलो अलर्ट देण्यात आलेल्या या भागांमध्ये आज पावसाचीही शक्यता आहे,
२ डिसेंबरपासून प्रणाली विरळ होवून वातावरण निवळेल, असा अंदाज आहे, आता हळूहळू थंडीतही वाढ होऊ लागल्याचं जाणवत आहे
आज संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, मात्र, अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता. राज्यात आज गारपिटीची शक्यता नाही. आज महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, विदर्भ ,मराठवाडा,आणि माध्यमहाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून, यामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, , हिंगोली, जालना, नांदेड, गोंदियामध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा