भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गारपीट सह पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळी वातावरण निवळेल असा आशावाद निर्माण झालेला असताना आणि भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.जळगाव, अहमदनगर, पुणे येथेही पुढील चार दिवसांमध्ये अधूनमधून पाऊस पडू शकतो.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचे सावट असल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, काही जिल्ह्यांत मेघ गर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यात मुंबईसह कोकण पट्ट्याचा समावेश आहे. नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम  स्वरुपाचा पाऊस होईल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल. धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत हलक्या सरी, तर त्यानंतर विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे शनिवारी विजांसह पाऊस पडू शकेल. तोपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!